esakal | व्हायरल व्हिडिओ महिलांसाठी ठरतात जीवघेणे
sakal

बोलून बातमी शोधा

 Viral videos are life threatening for women

कोल्हापूर  : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण दांपत्याचा दोघा अज्ञात तरुणांनी पाठलाग करत काही सेकंद त्यांचा व्हिडिओ केला आणि तो ग्रुपमध्ये व्हायरल केला. कालांतराने तो व्हिडिओ त्या पतीच्या मोबाईलवरही आला. त्याने तो व्हिडिओ पाहून पत्नीला, "तू मागे का बघितलेस?' म्हणून विचारले. यातून त्या दोघांत वाद सुरू झाले. ते टोकाला गेले. मानसिक तणावातून पत्नीने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला, अशाच प्रकारे अन्य एका युवतीचा कॉलेजमधील व्हिडिओ व्हायरल झाला. वर्षभरापूर्वीचा तो व्हिडिओ पाहून पालकांनी रागाने त्या मुलीचे शिक्षणच बंद केले. 
वरील दोन्ही प्रकरणांत त्या महिलांचा काहीही दोष नसला तरी दुर्दैवाने त्या सोशल मीडियाच्या विकृत वर्तनाच्या बळी ठरल्या. 

संपादन - यशवंत केसकर

व्हायरल व्हिडिओ महिलांसाठी ठरतात जीवघेणे

sakal_logo
By
मोहन मेस्त्री

कोल्हापूर  : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण दांपत्याचा दोघा अज्ञात तरुणांनी पाठलाग करत काही सेकंद त्यांचा व्हिडिओ केला आणि तो ग्रुपमध्ये व्हायरल केला. कालांतराने तो व्हिडिओ त्या पतीच्या मोबाईलवरही आला. त्याने तो व्हिडिओ पाहून पत्नीला, "तू मागे का बघितलेस?' म्हणून विचारले. यातून त्या दोघांत वाद सुरू झाले. ते टोकाला गेले. मानसिक तणावातून पत्नीने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला, अशाच प्रकारे अन्य एका युवतीचा कॉलेजमधील व्हिडिओ व्हायरल झाला. वर्षभरापूर्वीचा तो व्हिडिओ पाहून पालकांनी रागाने त्या मुलीचे शिक्षणच बंद केले. 
वरील दोन्ही प्रकरणांत त्या महिलांचा काहीही दोष नसला तरी दुर्दैवाने त्या सोशल मीडियाच्या विकृत वर्तनाच्या बळी ठरल्या. 
अशात त्यांच्या नातेवाईकांनी पडताळणी न करताच, "तू त्या व्हिडिओकडे पाहिलेसच का?' असा मुद्दा घेतल्याने तणावात भर पडली. पुढे गुंतागुंत वाढली. त्यामुळे असा आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा छायाचित्र सोशल मीडियावर आले, ते आपल्या व्यक्तिगत जीवनास बाधा आणणारे असेल तर तातडीने पोलिसांत तक्रार करण्याचा मार्ग आहे. तसेच मानसिक त्रास होत असल्यास समुपदेशकांकडे जाणेही महत्त्वाचे आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांनाच आता मुलांनाही मोबाईल द्यावा लागतो. लॉकडाउन काळात दैनंदिन गरजा मोबाईलद्वारे पूर्ण केल्या जात आहेत. यापुढे पालकांनीच मुलांच्या मोबाईल वापरावर "वॉच' ठेवण्याची गरज आहे. 

त्यांचाही शोध सुरू 
राजकीय नेत्याविरोधात काही कॉमेंट्‌स व्हॉट्‌सऍपवर दिसल्या की पोलिसांची कारवाई होते. दाम्पत्याचा विचित्र व्हिडिओ करणाऱ्यांना सीसी टीव्हीद्वारे शोधण्याचे काम सुरू आहे. अशा प्रवृत्तीलाच कायद्याचा धाक दाखविण्याची गरज आहे. 

सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच आहेच. महिलांच्या बाबतीतल्या गुन्ह्यात पोलिस कठोर कारवाई करत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या आहेत. महिला किंवा मुलींनी संकोच न करता पोलिसांशी संपर्क साधावा. 
- संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम ब्रॅंच

loading image
go to top