Vishalgad Fort Encroachment Removalesakal
कोल्हापूर
कडक बंदोबस्तात किल्ले विशाळगडावरील चौदा अतिक्रमणे जमीनदोस्त; 100 पोलिसांचा फौजफाटा, 45 जणांनी आणली न्यायालयीन स्थगिती
Vishalgad Fort Encroachment Removal : ‘गडावरील १५८ पैकी ९४ अतिक्रमणे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात काढण्यात आली. पंचेचाळीस जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे. पाच जणांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेतली आहेत.'
आंबा (कोल्हापूर) : सात तासांच्या मोहिमेनंतर कडक बंदोबस्तात किल्ले विशाळगडावरील चौदा अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाने गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मे २०२५ पर्यंत काढण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार किल्ले विशाळगड येथील उच्च न्यायालयाची स्थगिती नसलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे काढण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.