कोल्हापूर : विशाळगडावर (Vishalgad) कुर्बानीसाठी उच्च न्यायालयाने (High Court) घालून दिलेल्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. गडावरील रहिवाशांना कुर्बानीसाठी जागा व वेळ ठरवून दिली असून तेथे सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गडावर तसेच पायथ्याला कडोकोट पोलिस (Kolhapur Police) बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली.