किल्ले पन्हाळगडावरील ईदगाह मैदान येथे अनधिकृत मजारचे बांधकाम चालू असल्याबाबत सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक चित्रफीत (व्हिडिओ) प्रसारित करण्यात आला होता.
पन्हाळा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ऐतिहासिक पन्हाळगड (Panhalgad) व पावनगडावरील अतिक्रमणे सरसकट काढावीत व दोन्ही गडाची तटबंदी मोकळी करावी, अशा मागणीचे पन्हाळगडावरील १६ तर, पावनगडावरील ७ ठिकाणांच्या यादीसह निवेदन विश्व हिंदू परिषद, (Vishwa Hindu Parishad) बजरंग दलाचे विभाग संयोजक सुरेश रोकडे यांनी पन्हाळा नगरपरिषदेला दिले.