यशराज घाटगे (बारामती) यांच्या १२ महिने वयांच्या सहा किलोंच्या 'राजा' कोंबड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसह अबालवृद्धांनी गर्दी केली.
वारणानगर : येथील वारणा कृषी प्रदर्शनाचे (Warana Krushi Pradarshan) उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे (Warana Dudh Sangha) उपाध्यक्ष एच. आर. जाधव, ‘शेतीपूरक’चे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते व समूहातील संचालक, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनास साहाय्य केले आहे.