

Civic Election Battle
sakal
कोल्हापूर : माजी नगरसेवकांमधली तुल्यबळ लढत प्रभाग क्रमांक १८ मध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रभागातील उमेदवार हे नेत्यांच्या सर्वात जवळ असणारे कारभारी आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या प्रभागात विकासकामे झाली असली तरी मतदारांचे वैविध्य असल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
- ओंकार धर्माधिकारी