esakal | 'गोडसाखर' बंद पाडण्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

 Appasaheb Nalwade of Gadhinglaj Sugar Factory

'गोडसाखर' बंद पाडण्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) सेवानिवृत्त कामगारांची थकीत रक्कम मिळालीच पाहिजे याविषयी काहीही हरकत नाही. परंतु ही रक्कम दिल्याशिवाय कारखान्याची चाके फिरु देणार नाही, या निवृत्त कामगारांच्या निर्णयाला विरोध आहे. कारखाना बंद पाडण्याच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

हेही वाचा: ACB ची कारवाई; महिला मंडलाधिकारीसह 2 कोतवाल जाळ्यात

निवेदनात म्हटले आहे की, कारखाना चालवण्यास देण्यात यावा किंवा स्वबळावर चालू करण्याबाबत सभासदांनी एकमुखी निर्णय दिला आहे. परंतु सेवानिवत्त कामगारांनी थकीत रक्कमेसाठी कारखान्याची चाके फिरु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. कारखान्यात शेकडो कामगार कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणातऊसही या कारखान्याला येतो. निवृत्त कामगारांची मागणी न्याय आहे. त्यास आमची कोणतीच हरकत नाही. परंतु, संघटनेच्या इशार्‍यानुसार कारखाना सुरुझाला नाही तर कामगार, शेतकरी, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी मालक-चालक अशी अनेक कुटूंबे वार्‍यावर पडणार आहेत. शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान होणार आहे.

हेही वाचा: इचलकरंजीत पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

यामुळे कुटूंबांना त्रास सहन करावा लागणार आहे. मुळात कोरोनामुळे सर्व क्षेत्र संकटात आहेत. त्यातच कारखाना सुरु झाला नाही तर कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. या बाबींचा विचार करुन कारखाना सुरु होणे महत्वाचे आहे. निवृत्त कामगारांच्या निर्णयास सर्वांचा विरोध आहे. कारखाना चालू झाला नाही तर सर्व कामगार, सभासद, शेतकरी, वाहतूकदार कारखाना बंद पाडण्याच्या विरोधात आंदोलन उभारणार आहेत. विश्‍वास खोत, लगमान्नाभम्मानगोळ, शामराव नदाफ, रवींद्र खोत, सचिन पाटील, मानसिंग जाधव, दशरथ दळवी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

loading image
go to top