esakal | कोल्हापूर - ACB ची कारवाई; महिला मंडलाधिकारीसह 2 कोतवाल जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

ACB

ही कारवाई वसगडे ग्राम पंचायत येथे आज करण्यात आल्याचे उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले

ACB ची कारवाई; महिला मंडलाधिकारीसह 2 कोतवाल जाळ्यात

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : २५ हजाराच्या लाचप्रकरणी महिला मंडलाधिकारीसह दोन कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. तक्रारदाराच्या बाजूने हरकतीचा निकाल दिल्याच्या कारणा बद्दल लाच घेतली आणि लाच मागणीला संमती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'बस'सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार

मंडल अधिकारी - अर्चना मिलिंद गुळवणी (वर ४७. रा. संभाजीनगर), सजा वसगडे कोतवाल - तात्यासाहेब धनपाल सावंत (३८, रा. वसगडे करवीर) आणि कोतवाल सजा गडमुडशिंगी-युवराज कृष्णात वड्ड (३५, रा. गडमुडशिंगी करवीर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई वसगडे ग्राम पंचायत येथे आज करण्यात आल्याचे उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

loading image
go to top