esakal | वीज बिले माफ करा, सक्तीने जोडणी तोडू नका ; आंदोलनाचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

warning of protest against maharashtra government

जो पर्यंत राज्य शासन वीज बिले माफ करीत नाही तो पर्यंत घरगुती वीज बिले भरली जाणार नाहीत

वीज बिले माफ करा, सक्तीने जोडणी तोडू नका ; आंदोलनाचा इशारा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महापालिकेचे बारा लाख, जिल्हाधिकारी कार्यालयाचे 19 लाख, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे बारा लाख, एवढे वीज बिले थकीत आहेत. याचा अर्थ शासनाकडे पैसे नाहीत असे असताना या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केलेला नाही आणि ज्या दिड दोन हजार रूपयांचे वीज बिल थकीत आहे, अशा घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत कसा करू शकता कोरोनाकाळातील वीज बिले माफ झाली पाहीजेत अन्यथा महावितरणलाच टाळे ठोकू असा इशारा वीज दरवाढ कृती समितीने महावितरण कंपनीला आज येथे दिला. 

वीज दरवाढ विरोधी कृती समितीने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेतली. कोरोनाकाळातील वीज बिले माफ करावीत, वसुली साठी महावितरणचे कर्मचारी लोकांच्या घरी पाठवून लोकांना त्रास देऊन नये अशी मागणी केली. 

निवास साळोखे म्हणाले की, "" कोरोना काळात लॉकडाऊन होता. याकाळात रिडींग न घेता सरासरी बिले दिली. वीज दरवाढ ही त्यात समाविष्ठ केली त्यातून बिले जास्त रक्कमेने आली यात कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांचे व्यवसाय रोजगार हिरावले पैसे नाहीत. अशात भरमसाठ वीज बिले आली ति भरण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने वीज बिल माफ करावीत असा मागणीसाठी आंदोलन केले निवेदन दिले. त्याचे काय झाले हे महावितरणने सांगावे.'' 

जो पर्यंत राज्य शासन वीज बिले माफ करीत नाही तो पर्यंत घरगुती वीज बिले भरली जाणार नाहीत. उर्जामंत्री बिले माफ करता येणे मुश्‍कील असल्याचे म्हणतात तर मुख्यमंत्र्यांनी 300 युनिटच्या आतील वीज बिल माफ करणार असल्याचे सांगितले होते. मात्र तसे घडलेले नाही. महावितरण व राज्य शासनाने वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा तो पर्यंत महावितरणने वीज बिलांची वसुली सक्तीने करू नये तसेच कोणाचीही वीज मीटर जोडणी तोडू नये अशा शब्दात कृती समितीच्या सदस्यांनी येथे भूमिका मांडली. 

जो पर्यंत वीज बिल माफ होत नाहीत तो पर्यंत टप्प्याने - टप्प्याने आंदोलन सुरूच राहील असेही यावेळी कृती समितीने सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत बाबा इंदुलकर, दिलिप देसाई, बाबासाहेब पाटील - भुयेकर, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा पक्षिय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू; भाजप अध्यक्षांचा दौरा, कॉंग्रेसतर्फे बैठक

कोरोनाकाळातील वीज बिले माफ करावी याबाबत शासनाने निर्णय घेई पर्यंत वीज बिलांची सक्तीने वसुली करू नये, असे कृती समितीने सांगितले. त्यानंतर श्री. निर्मळे यांनीही विज बिलांच्या वसुलीसाठी वीज मीटरची जोडणी तोडणार नाही असे आश्‍वासन मुख्य अभियंता श्री निर्मळे यांनी दिले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top