esakal | ज्येष्ठांना इशारा ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 90 टक्के वयोवृद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Warning to seniors: 90 percent of coronary artery deaths are elderly

कोल्हापूर ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूची वाढती संख्या धडधाकट व्यक्तीलाही धडकी भरवत आहे. अशा स्थितीत बाधित व्यक्तींमध्ये मृत्यू झालेल्या 85 टक्के व्यक्तींचे वय 65 च्या पुढे आहे. तर बहुतेक सर्वांना अन्य आजारांची अतीगंभीर लक्षणे होती. त्यातील अनेकांना मृत्यू झाला. यापेक्षाही कोरोनाबाधित असताना गंभीर अवस्थेतील रुग्ण वेळीच उपचाराने बरे होण्याचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. अशा स्थितीत कोरोना म्हणजे सरसकट मृत्यू अशी विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही, तरीही काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

ज्येष्ठांना इशारा ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 90 टक्के वयोवृद्ध

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूची वाढती संख्या धडधाकट व्यक्तीलाही धडकी भरवत आहे. अशा स्थितीत बाधित व्यक्तींमध्ये मृत्यू झालेल्या 85 टक्के व्यक्तींचे वय 65 च्या पुढे आहे. तर बहुतेक सर्वांना अन्य आजारांची अतीगंभीर लक्षणे होती. त्यातील अनेकांना मृत्यू झाला. यापेक्षाही कोरोनाबाधित असताना गंभीर अवस्थेतील रुग्ण वेळीच उपचाराने बरे होण्याचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. अशा स्थितीत कोरोना म्हणजे सरसकट मृत्यू अशी विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही, तरीही काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 
साडे पाच महिन्यांत 1 हजार 336 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात हे मृत्यू झालेत. आरोग्य विभागाच्या अहवालातील काही निरीक्षण अशी ः वरील व्यक्तींचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हा त्यांच्या आरोग्याच्या तपासणीत तीव्र स्वरूपाचा मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुसाचा संसर्ग, अवयव खराब असणे, मेंदू विकार, किडणी फेल, कर्करोग, यकृताचे आजार अशी लक्षणे होती. यात यापूर्वी अनेकांवर उपचार व काहीच्या शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. 
अशात जुन्या आजारांची लक्षणे असताना कोरोनाबाधा झाली. या काळात उपचार सुरू असताना किंवा उपचाराला आणताना अनेकांचा मृत्यू झाला. यात 3 ते 35 वयोगटांतील अवघ्या दहा व्यक्ती आहेत. 35 ते 45 वयोगटांतील 65 व्यक्ती आहेत. तर 45 ते 65 वयोगटांतील 125 व्यक्ती आहेत. उर्वरित सर्व व्यक्ती 65 ते 95 वयोगटांतील आहेत. त्यामुळे बाधित व्यक्तीमधील 90 टक्के व्यक्ती वयोवृद्ध आहेत. तर 35 ते 65 वयोगटांत पुरुषामध्ये अनेकांना हृदयविकार तसेच गंभीर व्यसनामुळे झालेले गुंतागुंतीचे आजार याचे प्रमाण आहे. मृतांमध्ये हृदयविकारांचा झटका तसेच फुफ्फुसाचा गंभीर संसर्गांचे प्रमाण लक्षणीय आहे. कोरोना ज्या काळात नव्हता, त्याकाळातही मृत्यूचे प्रमाण होते. कोरोनाकाळात हे प्रमाण 0.2 ने वाढले आहे. 

"" कोरोनाबाधा कोणालाही होऊ शकते मात्र ज्यांना पूर्वीचे गुंतागुंतीचे आजार तीव्र आहेत (को मॉर्बेलिटीज) अशांना कोरोना बाधा अधिक तीव्रतेची होते. यात त्यांच्या आजाराची गुंतागुंत वाढते. वयोमानानुसार किंवा आजारामुळे शरीर उपचाराला साथ देत नाही अशा व्यक्तींच्या जीवाचा धोका वाढू शकतो. अशा अती गंभीर अवस्थेतील बाधितांचे मृत्यू अधिक झालेत. ही बाब विचारात घेता ज्यांना पूर्वीचे आजार आहेत. त्यांनी अधिक काळजी घेणे तसेच कोणतेही लक्षण अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून वेळीच उपचार करून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.'' 
डॉ. अक्षय बाफना ः हृदय विकारतज्ज्ञ, सीपीआर रुग्णालय. 

loading image
go to top