
Water Level Panchganga River : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल(ता.३०) सकाळपासून दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत १४ इंचाने वाढ झाली. तसेच राधानगरी, दूधगंगा, पाटगावसह प्रमुख धरणक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नद्यांचे पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली गेले असून २० मार्ग बंद झाले.