
उजळाईवाडी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामादरम्यान सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठ्यात वारंवार झालेल्या गळतीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, ही जलवाहिनी स्थलांतरावरून महामार्ग प्राधिकरण व औद्यागिक विकास महामंडळ यांच्यात खडाखडी सुरू आहे.