
कोल्हापूर : मूळचे मंगळवार पेठ, खासबाग परिसरातील प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते व सध्या पुणे येथे आयटी कंपनीत अभियंता असलेल्या संकेत जोशी व सोनाली नायक आज विवाहबद्ध झाले. क्लबच्या प्रथेप्रमाणे कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवर लक्ष वेधण्यासाठी या नवदांपत्याची रोडरोलर-बॉयलरवरून अनोखी वरात काढून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.