

Shoppers browse fresh vegetables at a weekly market
sakal
कोल्हापूर : गेल्या दोन आठवड्यापासून आठवडा बाजारात पालेभाज्यांसह काही फळ भाज्यांचे दर उतरले आहेत. विशेषतः मेथीचा दर पाच रुपये पेंडी असा घसरला आहे, तर शेवगा, गवारीचा तोरा कायम राहिला आहे. शेवगा, पोकळा, करडई, पालक, चाकवत, लालमाठचा दरही अगदी पाच ते सात रुपये असा राहिला. बाजारात शेवगा, गवारी वगळता इतर भाज्या स्वस्त झाल्या आहेत.