घरोघरी गौराईचे स्वागत; आज येणार शंकरोबा 

Welcome home gourds; Shankaroba will come today
Welcome home gourds; Shankaroba will come today
Updated on

कोल्हापूर : "ये गं नदी वाटेला, गाणी गा रे पाखरा 
गाणी गा रे पाखरा, गौराई येते माहेरा' 
अशी पारंपरिक गौराई गीते गात, झिम्मा फुगडीचा फेर धरत उत्साहात घरोघरी गौराईचे आगमन झाले. नदी, विहिरी अशा पारंपरिक ठिकाणी गौराई आगमनासाठी होणारी गर्दी यंदा कोरोनाच्या धसक्‍याने टाळून गल्लीतील पाण्याची टाकी, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणीच गौराईला न्हाऊ घालून पूजन केले. ठिकाण बदलले, तरी त्याच पारंपरिक उत्साहात घरोघरी गौराईचे स्वागत केले. 
गणेशाच्या आगमनानंतर मंगळवारी सकाळपासूनच गौराईच्या आगमनाची तयारी सुरू होती. दुपारनंतर पारंपरिक उत्साहात गौराईला नेण्यासाठी महिला, तरुणींनी गल्लीतच गौरीचे डहाळे कलशात घेऊन गौराईचे पूजन केले. झिम्मा फुगडीचा फेर धरत आनंद लुटला. पावसाने उसंत घेतल्याने महिलांच्या उत्साहात आणखी भर पडली. 
सुखसमृद्धी घेऊन सोनपावलांनी आलेल्या गौराईचे पंचारती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर गणरायाच्या शेजारी गौरीची प्रतिष्ठापना केली. देवीची आरती म्हणून, भाजी-भाकरी, वडीचा नैवेद्य दाखवला. सायंकाळी गौराईला मुखवटे लावून भरजरी वस्त्रांनी गौरीला सजविण्यात महिला वर्गाची लगबग सुरू होती. दरवर्षी गौराई आल्यानंतर झिम्मा-फुगडीचा फेर धरत रात्र जागवली जाते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे महिलांना झिम्मा-फुगडीचा फेर धरता आला नाही. दरम्यान, बुधवारी (ता. 26) घरोघरी शंकरोबाचे आगमन होणार असून गौराई - शंकरोबाचे यथासांग पूजन होईल. 

कोरोनामुळे झिम्म्याचा फेर नाहीच 
पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटितीर्थ, राजाराम तलाव, तसेच कळंबा येथे गर्दी होऊ नये म्हणून बॅरिकेडस्‌ लावून प्रवेश बंद केले आहेत. दरवर्षी येथे रंगणारा झिम्मा-फुगडीचा फेर रंगलाच नाही. पारंपरिक वेशभूषेत येथे गौराई नेण्यासाठी आलेल्या तरुणी, महिलांना निराश होऊन परतावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com