esakal | यंत्रमाग कामगारांसाठी हसन मुश्रीफ यांची महत्वाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्रमाग कामगारांसाठी हसन  मुश्रीफ यांची महत्वाची घोषणा

यंत्रमाग कामगारांसाठी हसन मुश्रीफ यांची महत्वाची घोषणा

sakal_logo
By
पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी येत्या महिन्याभरात स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज केली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने येथे मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते आज करण्यात आला. यावेळी त्यांच्याहस्ते मंडळाच्यावतीने विविध योजनांच्या लाभाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. रोटरी सेंट्रलच्या (Rotary Central) मर्दा मानव सेवा केंद्रामध्ये (Manav Sewa Center)हा कार्यक्रम झाला.(welfare-board-will-be-set-up-for-machine-spinning-workers-ichalkarnji-kolhapur-marathi-news)

मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या समितीने अहवाल दिला होता. सद्या कोरोनामुळे मंत्रलयात बैठका घेता आल्या नाहीत. मात्र व्हीसीव्दारे याबाबतची राज्यपातळीवरील व्यापक बैठक घेवून येत्या महिन्याभरात यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल. यासाठी मालकांनी सेस द्यावा लागतो. सूतावर सेस लावून मंडळासाठी निधी उपलब्ध करता येईल.

ते म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी मंडळ स्थापन करण्याचा केंद्र शासनाने कायदा केला. त्याची अंमलबजावणी आपल्या कारकिर्दीत झाली. सद्या मंडळाकडे ११ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. या मंडळाच्या माध्यमातून २२ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत नविन २१ प्रकारच्या कामगारांचा समावेश केला आहे. त्या सगळ्यांना शोधून त्यांना लाभ देण्याची जबाबदारी संघटनांची आहे.

हेही वाचा- दूध उत्पादकांना Good News : गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात मोठी वाढ

कोरोनासारख्या महामारीने मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गर्भवती महिलेला चार महिन्याचे अनुदान देण्यात येणार आहे.सुरुवातीला दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मयूर शहा यांनी स्वागत तर अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी प्रास्तावि केले. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे भरमा कांबळे यांनी प्रलंबीत मागण्यांचा आढावा घेतला. आभार सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी मानले. व्यासपिठावर प्रांताधिकारी डाॅ.विकास खरात, माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, ए.वाय. पाटील, अमित गाताडे यांच्यासह क्रेडाईसह कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थीत होते.

आवाडे खुश झाले असते

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या घोषणेचा संदर्भ देत मंत्री मुश्रीफ यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर खोचक टिप्पणी केली. ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आवाडे उपस्थीत असते तर ते मंडळाची घोषणा ऐकूण खुश झाले असते. त्यांचा गुस्सा आता कमी झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आता खुश असतील म्हणून कार्यक्रमाला आले नसतील.

loading image