टाईमपास करायला गेले आणि जुगार अड्डे बनला

 Went to timepass and became a gambling den
Went to timepass and became a gambling den
Updated on

कोल्हापूर,  ः हाताला काम नाही, टीव्ही बघून कट्ट्यावर बसून कंटाळा आलाय. टाईमपाससाठी पत्त्यांचे दोन डाव खेळू म्हणत जुगाराचे अड्डे तयार होऊ लागलेत. शहरासह जिल्ह्यात याचे प्रमाण वाढत आहेत. त्यात महिलाही सक्रिय होत असल्याचे धक्कादायक सत्य पोलिसांच्या कारवाईतूनच समोर येत आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउननंतर अनेक तरुणांचे रोजगार गेले. हाताला काम नसल्याने ही मंडळी गावाकडे परतली. हाताला काम नसणारी ही मंडळी गल्लीतील कट्ट्यावर बसू लागली. टाईमपासचे साधन पत्त्यांचे डाव रंगू लागले. बघता बघता त्याचे रुपांतर जुगार अड्ड्यात होऊ लागले. भागातील एकादी रिकामी खोली, निर्जनस्थळी झाड, भिंतीचा आडोसा या अड्ड्यांसाठी घेतला जातो. अशा अड्ड्यात तरुणाई ओढली जात आहे. काही घरमालकांनी मटका मालकांना आपल्या शहरापासून दूर अंतरावर असणाऱ्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत. जुगारात आता महिलांही सक्रिय होत असल्याचा धक्कादायक सत्य राजारामपुरी पोलिसांनी टेंबलाईनाका परिसरात छापा टाकून उघडकीस आणले. या जुगाराच्या व्यसनात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्थ होऊ लागले आहेत. 
मुलांना उच्चशिक्षित केले. मुंबई, पुण्यात ती स्थिरस्थावर झाली होती. लॉकडाउननंतर हातच काम गेल्याने ती गावकडे आलीत. गल्लीतील टोळक्‍यात मिसळू लागल्याने त्यांना जुगारा सारखं व्यसन तर लागणार नाही, ना अशी भीती आज पालकांच्यात वाढू लागली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने कोरोना संकटातही अवैध धंद्यावरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यांनी लॉकडाउन काळात पाठोपाठ जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईतून त्याची झलकही दाखवून दिली आहे. 


दीड महिन्यातील जुगार अड्ड्यावरील कारवाईचे स्वरूप 
भाग*ताब्यात*जप्त मुद्देमाल 
रविवारपेठ, लक्षतीर्थ*7*24 हजार 
सुभाषनगर*9*79 हजार 
राजारामपुरी*10*97 हजार 
हुपरी*31*62 हजार 
टेंबलाईनाका*8 (सहा महिलांसह)*14 हजार 
कंदलगाव*17*1 लाख 88 हजार 
----- 
जुगार अड्ड्यावर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. भागात छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या अड्ड्यांची माहिती नागरिकांनी द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेऊ - डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उपअधीक्षक. 

 

- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com