‘आजी’चा ‘माजी’ झालो म्हणून मला मार्गदर्शक केल्याची खोट आहे का, असे वाटते,’ असे सांगत माजी आमदार राजेश पाटील यांनी या कार्यक्रम पत्रिकेतील ‘मार्गदर्शक’ या उल्लेखाबाबत खंत व्यक्त केली.
कोल्हापूर : ‘सहाव्यांदा आमदार झाल्यानंतर नूलमधील सत्कारात आम्ही दिलेली गदा आमच्यावर नको, तर विरोधकांवर फिरविण्यात यावी. आपला पक्ष महायुतीमधील घटक असला, तरी ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी’, अशी रोखठोक अपेक्षा माजी आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे व्यक्त केली.