

-संदीप खांडेकर
कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ८०२ पदांसाठीच्या परीक्षेत २३ संवर्गांतील परीक्षार्थी वेटिंगवर आहेत. वर्ष होऊनही परीक्षेची तारीख जाहीर झाली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. एकूण चौतीस पैकी केवळ अकरा संवर्गांसाठी परीक्षा झाली असून, उर्वरित संवर्गांसाठीची परीक्षा कधी होणार हे समजू शकलेले नाही. आयबीपीएस कंपनीतर्फे परीक्षेची तारीख कधी जाहीर करणार, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.