कोल्हापूर: अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर पुनर्विकास आराखडा आणि जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर झाला. मात्र, आराखड्याच्या अंमलबजाणीसाठी देवस्थान समितीला अध्यक्ष व सदस्यच अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे आराखड्याचे काम गतीने होण्यासाठी देवस्थान समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणे आवश्यक आहे. महायुतीच्या (Mahayuti) अंतर्गत राजकारणामुळे देवस्थान समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड रखडली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.