जावई आला भेटीस अन् गावाला धरलं वेठीस... 

mask
mask
Updated on

राशिवडे बुद्रुक - शिरगाव (ता.राधानगरी) येथील एका घरात आलेल्या जावायामुळे सबंध कुटुंबाला आणि गावातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार आज पुढे आला. चार दिवसापूर्वी आलेला हा जावईच कोरोना पाॅझिटिव्ह आला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सासरवाडीतील आणि आसपासच्या तब्बल वीस जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे 'जावई आला भेटीस आणि गावाला धरले वेठीस' अशी स्थिती पुढे आली आहे.

सबंध गाव गेले हादरून

येथील एका कुटुंबातील जावई कोल्हापूर येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. चार दिवसांपूर्वी तो ड्युटी वरून सासरवाडीत आला होता. त्यावेळी त्याला ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे जाणवून आली. असीच तो सासरवाडीत थांबला. त्याने गावातील एका खासगी डॉक्टरा कडून उपचार घेतले. मात्र फारशी प्रगती न झाल्याने त्याने राधानगरी कोविड सेंटरमध्ये जाऊन आपला स्वॅब दिला. दोनच दिवसात तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सबंध गाव हादरून गेले.

गावात दक्षता कमिटीकडून विशेष दक्षता घेण्यासाठी गावकऱ्यांना सूचित केले. संबंधित घर आणि तो परिसर सील करण्यात आला. मात्र जावई अनेकांच्या संपर्कात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले. काल सासुरवाडी आणि आसपासच्या 23 लोकांना राधानगरी येथे कॉरंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. पैकी आज वीस जण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आज सबंध शिरगाव गावावर दहशत पसरली आहे.

 गावात नाकेबंदी

गावातील ज्या डॉक्टरांच्याकडे उपचार घेतला त्यांच्यापासून आणखी पन्नास लोक या कुटुंबाच्या संपर्कात आल्याचे समजते. त्यामुळे कुणाकुणाला तपासणीला घेणार हा प्रश्न आता आला आहे. हा धोका विचारात घेऊन येथील ग्राम दक्षता कमिटी ग्रामपंचायत व शासकीय अधिकाऱ्यांनी गावात नाकेबंदी केली आहे. सरपंच रूपाली व्हरकट व सर्व सदस्यांनी गावाला दक्षतेचा इशारा दिला आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Kolhapur water pumping banned?
Falling River Levels Trigger Water Scarcity Fears Across Kolhapur District
Kolhapur irrigation ban relaxation for farmers
Nagardale police constable news
Marathi News Esakal
www.esakal.com