esakal | अंगावर शहारे आणणारी घटना; पतीच्या पार्थिवाशेजारीच रडत-रडत अर्धांगिनीनेही सोडले प्राण 
sakal

बोलून बातमी शोधा

wife dead after husband death kolhapur

गुलाब यांनी सकाळी नऊ वाजता पत्नीकडे चहा मागितला. पत्नी चहा करून घेवून आली तेव्हा गुलाब शांत पडले होते.

अंगावर शहारे आणणारी घटना; पतीच्या पार्थिवाशेजारीच रडत-रडत अर्धांगिनीनेही सोडले प्राण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगवडेवाडी (कोल्हापूर) : जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण अटळच आहे. परंतु, हे मरण कधी, कोठे आणि कसे येईल हे आपल्याला माहित नसते. पण आयुष्यभर ज्याच्यासोबत संसार केला, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, संपूर्ण आयुष्य एकमेकांसीठी व्यथित केलेल्या जोडीदाराच्या मृतदेहाजवळच मरण आले तर हे मरण पाहणाऱ्याची काय अवस्था होईल, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. कोल्हापुरात नुकतीच अशी मन हेलावणारी घटला घडली आहे. पतीच्या मृतदेहाशेजारी रडत असतानाच पत्नीलाही मरण आल्याने परिसरात हळहळ व्यक होत आहे. 

येथील गुलाब सहदेव कांबळे (वय 77) यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. पती निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नी लक्ष्मी गुलाब कांबळे ( वय 72) यांनी पतीच्या मृतदेहाजवलच अवघ्या तासाभरात आपला प्राण सोडला. पतीच्या मृतदेहाजवळ बसून त्या आक्रोश करत असतानाच ही घटना घडली. या आकस्मित घडलेल्या घटनेने शेजारी व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. दोघेही पती-पत्नी शांत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मुलांचे लहान असतानाच निधन झाल्याने सध्या ते दोघेच घरी राहत होते. अशा दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळाच पसरली आहे. 

गुलाब यांनी सकाळी नऊ वाजता पत्नीकडे चहा मागितला. पत्नी चहा करून घेवून आली तेव्हा गुलाब शांत पडले होते. त्यांनी आजूबाजुच्या नागरिकांना आणि नातेवाईकांना बोलविले. तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे मृतदेहाजवळच पत्नी लक्ष्मी रडत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईक येईपर्यंत लक्ष्मी यांना दवाखान्यात नेले. तेथे किरकोळ उपचार घेवून त्यांना पुन्हा घरी आणले.

हे पण वाचा - केस मागे घेतल्यास निधी वाढणार ; सत्ताधाऱ्यांची विरोधकांना अनोखी ऑफर 

साधारण अकरा-साडेअकराच्या सुमारास त्या पतीच्या मृतदेहाजवळच बसल्या असताना त्यांना अस्वस्थ वाटून त्यांनी तेथेच प्राण सोडला. यानंतर नातेवाईकांनी गुलाब यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पुन्हा पत्नी लक्ष्मी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या दोघांनाही गुलाब यांच्या भावाच्या नातवाने अग्नी दिला. गुलाब हे पूर्वी शाहू मीलमध्ये नोकरीस होते. त्यांचा अपघात झाल्यामुळे नोकरी सोडून ते शेती करीत होते. 

हे पण वाचाकोल्हापूर ; हातकणंगलेतील त्या स्वस्त धान्य दुकानाच्या परवाना रद्दचा अहवाल

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top