गडहिंग्लज : भांडी घासत असणाऱ्या पत्नीला दारू (Alcohol) पिऊन आलेल्या पतीने प्लास्टिक पाईपने मारले. त्यानंतर झालेल्या झटापटीत हातात सापडलेल्या चाकूनेच पत्नीने पती रमेश रावसाहेब मोरे (वय ४०) याच्या गळ्यावर मधोमध वार केला. वार वर्मी लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार तालुक्यातील लिंगनूर कसबा नूलमध्ये घडला.