सेनापती कापशी : वडगाव (ता. कागल) येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने शेतकरी पतीचा खून केल्याचे आज उघड झाले. शिवाजी बंडू शिंदे (वय ४७, रा. वडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगूड पोलिसांत (Murgud Police) याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आठ तासांत खुनाचा छडा लावला. शिवाजीची पत्नी कांचन शिवाजी शिंदे (वय ४५) आणि तिचा प्रियकर चुलत दीर चंद्रकांत धोंडिबा शिंदे (वय ४४) यांना ताब्यात घेतले.