esakal | रस्ता ओलांडतानाच त्यांच्यावर काळाचा घाला 

बोलून बातमी शोधा

woman dead in accident at kolhapur

मार्केट यार्ड जवळ आज सकाळी झालेल्या अपघातात महिला जखमी होऊन बेशुद्ध झाली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अंकिता कैलास पोवार (वय 45, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ) असे त्यांचे नाव आहे.

रस्ता ओलांडतानाच त्यांच्यावर काळाचा घाला 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मार्केट यार्ड जवळ आज सकाळी झालेल्या अपघातात महिला जखमी होऊन बेशुद्ध झाली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अंकिता कैलास पोवार (वय 45, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. 

हे पण वाचा - अपंग दांपत्यांना मिळाले 5 मिनिटात शिधापत्रिका

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, बुधवार पेठेत राहणाऱ्या अंकिता पोवार या मार्केट यार्ड येथे नोकरी करतात. नोकरीसाठी त्या एकतर केएमटी बस अगर वडापने जातात. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्या घरची कामे अवरून सोन्या मारुती चौकातून रिक्षाने मार्केट यार्ड येथे गेल्या. मार्केट यार्ड गेट नंबर एकच्या दिशेन रस्त्या ओलंडून जात होत्या. दरम्यान मौसीन तकदीर मुजावर (रा. राजारामपुरी परिसर) हे ट्रक घेऊन मार्केट यार्डच्या गेटसमोरून जात होते. त्यावेळी त्यांच्या ट्रकची पोवार यांना जोराची धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. 

हे पण वाचा -  ते विदेशातून आलेत, पण