

पेठवडगाव : जोतिबा दर्शनाला जाताना मोटारसायकल घसरून महिला ठार झाली, तर पती व मुलगा जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गौरी तेजस गायकवाड (वय ३५, रा. वाठार, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर पती तेजस व मुलगा हार्दिक जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.