श्रीमती गावडे यांचा जीबीएस सिंड्रोममुळे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शिळे अन्न खाऊ नका व पाणी उकळून पिण्याबाबत आवाहन केले आहे.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील (Chandgad Taluka) सोनारवाडी येथील गौराबाई रामू गावडे (वय ६०) यांचा गुलियन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome GBS) आजाराने गुरुवारी (ता. १३) सायंकाळी मृत्यू झाला. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) त्यांच्यावर उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अन्य सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती चांगली आहे.