शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथे चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात (Shirol Accident) हरोली येथील डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. स्नेहल विजय उपाध्ये (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी, एक मे रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हरोली येथील डॉ. स्नेहल उपाध्ये या आपल्या मोपेडवरून जांभळीमार्गे दवाखान्यात जात होत्या.