
Kolhapur Ended Life Women : तीन पैकी एक मुलगी यंदा पहिलीच्या वर्गात प्रवेश करणार होती. तिच्यासह चौथीत शिकणारा मुलगा व दुसरीत शिकणाऱ्या मुलीला शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी म्हणून बाप बाजारात गेला; पण आईच्या मनात वेगळेच चालले होते. आईने मुलगा अभिषेकला गाठल्यावर थांबविले आणि तिन्ही मुलींना सोबत घेत मेंढ्या चारण्यासाठी गेली. नंतर जे काही घडले ते धक्कादायकच होते. अन् हसत-खेळत सुरू असलेल्या संसारात मिठाचा खडा पडला.