कुडित्रे : करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडा (Bhendai Dhangarwada in Karvir) येथे रस्त्याअभावी रुग्ण महिलेला रुग्णालयात (Hospital) आणण्यास खूप उशीर झाला. वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. रस्त्याअभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार, असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील लोकांना विचारला आहे.