इचलकरंजी : आर्थिक देवघेवीवरून महिलांनी थेट गावभाग पोलिस ठाण्यात (Ichalkaranji Police Station) गोंधळ घातला. तक्रार देताना समोरासमोर आल्यावर वाद एवढा वाढला की, महिलांनी चक्क चप्पल हातात घेऊन पद्मजा इंगवले या महिलेवर (Woman) धाव घेत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला.