esakal | सावधान : महिलांनो वाढता रक्तदाब आहे धोक्‍याची घंटा 

बोलून बातमी शोधा

women day special Rising blood pressure in women is a warning sign marathi news

डॉ.अक्षय बाफना ः राज्यात 22 तर कोल्हापुरात 27 टक्के प्रमाण 

सावधान : महिलांनो वाढता रक्तदाब आहे धोक्‍याची घंटा 
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : मुलगी किंवा सून गरोदर झाल्यापासून घरात आनंद समाधान व्यक्त होते. गरोदर काळ ते बाळंतपण सुखरूप होईपर्यंत त्या महिलांचा वाढता उच्च रक्तदाब, या आनंदाला चिंतेची जोड देतो. अशा गरोदरपणात व प्रसुतीनंतरच्या काळात उच्च रक्तदाब वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील 22 टक्के महिलांमध्ये रक्तदाब वाढतोय, तर कोल्हापूर जिल्ह्यात 27 टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब वाढतो आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये वाढणारा रक्तदाब चिंतेची बाब बनला असून तो नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणेच महत्वाचे बनले आहे. 


सीपीआर रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी गेल्या तीन वर्षात जवळपास 1 हजार 323 महिलांच्या वाढत्या रक्तदाबाच्या नोंदी घेतल्या आहेत. एकूणच महिलात रक्‍तदाबाचे प्रमाण वाढले आहे, यातही गरोदरपणा महिलांचे प्रमाण लक्षवेधी आहे. रक्त दाबवाढीत गरोदर महिलांसोबत एकाकी महिला, विधवा, परित्यक्‍त्या, कौटूंबीक कहलात सतत दुर्लक्षीत राहीलेल्या महिलांचा समावेश आहे, असे निरिक्षण नोंदवले आहे. 

रक्तदाबाची लक्षणे अशी 
60 ते 70 टक्के महिलामध्ये कोणतेही लक्षणे दिसत नाही 
30 ते 40 टक्के महिलांना सकाळी डोकेदुखी, थकवा येणे, अती घाम सुटणे, छाती भरून येणे, धडधड वाढणे, वेदणा होणे, चक्कर येऊन पडणे, पायाला सुज येणे, असुरक्षिततेची भावना येणे आदी. 

वाढत्या रक्तदाबाचे धोके असे 
मेंदूमध्ये लकवा बसण्याची शक्‍यता 40 टक्के. 
डोळ्यांना दिसणे कमी होणे, हृदयविकाराचा झटका 25 ते 40 टक्के, याशिवाय किडणी निकामी होणे, पायातील धमन्याने आजार जडण्याची 7 ते 10 टक्के शक्‍यता. कायम स्वरूपी दुर्लक्षातून अती रक्तस्त्राव होऊन मृत्यूचीही शक्‍यता असते. 

गरोदरपणातील रक्तदाबाचे धोके 
सतत फिट येणे, अन्य आजारांची सर्वाधिक गुंतागुंत झाल्यास मृत्यू येणे. 
संपूर्ण शरिरात गाठी निर्माण होणे. 
गर्भपात होणे, दिवस भरण्यापूर्वी प्रसुती होणे. 
बाळाची वाढ खुंटणे. 

रक्तदाब कसा ओळखावा 
ज्या महिलेला पहिल्यांदा रक्त दाब नव्हता, पण गरोदरपणाच्या वीस आठवड्यानंतर 140 ते 90 वर आढळून आलेला रक्तदाब हा उच्चरक्तदाब ही म्हणून गणला जातो. तसेच प्रसुतीच्या नंतरच्या सहाव्या आठवड्यानंतरही उच्चदाब कायम राहीला असेल तर तो फ्रि एक्‍झस्टिंग उच्च रक्तदाब कायम राहण्याची शक्‍यता अधिक असते. 
वरील दोन्ही रक्तदाबावर वेळीच उपाय योजना केली नाही तर हा रक्तदाब संबधीत महिलांना आयुष्यभर रहाण्याची शक्‍यता 40 टक्‍क्‍यांनी वाढते. 

महिलांमधील वाढत्या रक्तदाबाचे एकूण प्रमाण ः 
जगभरातील प्रमाण ः 33 ते 52 टक्के 
देशभरातील प्रमाण ः 33.2 टक्के 
राज्यभरातील प्रमाण 22.8 टक्के 
कोल्हापूरातील प्रमाण 27. 2 ते 29 टक्के 


संपादन-अर्चना बनगे