Cylinder Gas Price Hike : घरगुती गॅस दरामध्ये वाढ झाल्याने महिला वर्गातून संताप; 50 रुपयांची वाढ, महागाईची पुन्हा झळ

Cylinder Gas Price Hike : घरगुती गॅसचा दर (Gas Price) सध्या ८०६ रुपये आहे. त्यात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ही दरवाढ लागू केली जाणार आहे.
Cylinder Gas Price
Cylinder Gas Price Hikeesakal
Updated on

कोल्हापूर : महागाईची झळ सोसत असताना घरगुती गॅसच्‍या दरामध्ये वाढ झाल्याने महिला वर्गातून आज संताप व्यक्त झाला. पन्नास रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला. दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी (Petrol-Diesel Price Hike) दोन रुपयांच्या झालेल्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही, असे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (Kolhapur District Petrol Dealers Association) अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com