esakal | खेळ कुणाला दैवाचा कळला? मंदिरात पुजेची तयारी करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

खेळ कुणाला दैवाचा कळला?

आज घटस्थापना असल्याने, ते मंदिरात पुजेची तयारी करत होते.

खेळ कुणाला दैवाचा कळला?

sakal_logo
By
दत्ता वारके

बिद्री : आज घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात पुजेची तयारी करणाऱ्या पुजाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बोरवडे (ता. कागल) येथे घडली. जोतिराम शामराव गुरव (वय ४२) असे या पुजाऱ्याचे नाव असून, ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापने दिवशी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: राज्य शासनाकडून खुशखबर! इचलकरंजी मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी

पुजारी गुरव हे ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदिरात पुजाअर्चा करतात. आज घटस्थापना असल्याने, ते मंदिरात पुजेची तयारी करत होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी करुन मुधाळ तिट्टा येथील खाजगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शांत व मनमिळावू स्वभावाच्या जोतिराम यांनी ग्रामस्थांत आदराचे स्थान मिळवले होते. ऐन घटस्थापने दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

loading image
go to top