Tusker morning walk : यमेकोंड गावात टस्कराचे ‘मॉर्निंग वॉक’; महिला, पुरुषांची उडाली भंबेरी
Ajara News : गेले दीड महिने सिरसंगी परिसरात टस्कर वावरत आहे. ऊस, बांबू व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. ऊस, बांबू व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. त्याने गावात मारलेल्या फेरफटक्याची परिसरात चर्चा होती.
आजरा : यमेकोंड (ता. आजरा) येथे आज सकाळी सहा वाजता टस्कराने गावातून मॉर्निंग वॉक केला. पहाटे दूध घालण्यासाठी गेलेल्या महिला, पुरुषांची यावेळी चांगलीच भंबेरी उडाली. तत्पूर्वी त्याने गावाजवळील शेतातील ऊस, केळी पिकांचे नुकसान केले.