

Silver prices rising gold declining India
esakal
Gold Price Year End Outlook : जानेवारी २०२५ पासून होत असलेली सोने आणि चांदीच्या दरातील वाढ वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंचीत घसरणीने नवा उच्चांक केला आहे. ३१ डिसेंबरअखेर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ३४० रुपयांवर होता. तर मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार १९० रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस ४ हजार ४०१.५९ डॉलर्सचा नवीन उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत आणि जागतिक सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने चांदी आणि सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.