esakal | यंदा देखावे अन्‌ दर्शनही ऑनलाईन...! 
sakal

बोलून बातमी शोधा

This year, scenes and visions are also online

यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन दर्शनाबरोबरच ऑनलाईन देखाव्यांची संकल्पनाही काही मंडळातर्फे राबवली जाणार आहे. चार फुटांची मूर्ती, दहा बाय दहाचा मंडप या नियमांसह सुरक्षिततेच्या गोष्टींचे पालन करतच उत्सव साजरा होणार आहे

यंदा देखावे अन्‌ दर्शनही ऑनलाईन...! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन दर्शनाबरोबरच ऑनलाईन देखाव्यांची संकल्पनाही काही मंडळातर्फे राबवली जाणार आहे. चार फुटांची मूर्ती, दहा बाय दहाचा मंडप या नियमांसह सुरक्षिततेच्या गोष्टींचे पालन करतच उत्सव साजरा होणार आहे. बहुतांश मंडळांतर्फे यंदा मंडप न घालता मंडळाच्या अध्यक्षांच्या घरातच लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 
शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे यंदा 21 इंची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 21 फुटी महागणपतीची मूर्ती ज्या ठिकाणी तयार आहे,  त्या शाहू मार्केट यार्ड परिसरातच दर्शनासाठी खुली असेल. मात्र, पन्नास फुटांपेक्षा अधिक अंतरावरून येथे दर्शन घेता येणार आहे. मात्र, शिवाजी चौकात मंडळातर्फे ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली जाणार आहे. गर्दीवरच नियंत्रणाचे आदेश असल्याने यंदा देखावेही सादर होणार नाहीत. मात्र, काही मंडळांतर्फे ऑनलाईन देखावे सादर करता येतील का, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. 

असा असेल ऑनलाईन देखावा.... 
ज्या विषयावर देखावा सादर करायचा आहे, त्याचा व्हिडिओ तयार केला जाईल. त्याचे लाईव्ह प्रसारण त्या त्या मंडळाच्या फेसबुक पेजवरून केले जाईल. मात्र, घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे देखाव्यांना सुरवात होईल. रोज रात्री दोन विशिष्ट वेळांनाच देखाव्याचे लाईव्ह प्रसारण होईल. तत्पूर्वी ज्यांना देखावा पाहायचा असेल त्यांनी त्या त्या मंडळाच्या फेसबुक पेजवर नोंदणी करणे आवश्‍यक असेल. एका वेळी पन्नास ते साठ जणांनाच ऑनलाईन देखावा पाहता येईल. तत्पूर्वी काही वेळ वेटिंग पीरियड असेल. या काळात संबंधित मंडळांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली जाईल. थोडक्‍यात देखावे पाहण्याचा खराखुरा फिल देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. 

आरतीचेही फेसबुक लाईव्ह 
आरती व विविध धार्मिक विधींसाठीही केवळ चारच कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने अनेक मंडळांतर्फे सकाळी व सायंकाळच्या आरतीचेही फेसबुक लाईव्ह केले जाणार आहे. मंडळाच्या फेसबुक पेजवरून हे प्रसारण होणार असून त्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेतले जाईल. 

loading image
go to top