कोल्हापूर - भर दुपारी सपासप वार करून तरूणाचा खून

young boy killed in kolhapur kagal
young boy killed in kolhapur kagal
Updated on

कागल : आज भरदुपारी रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून येथे एका तरूणाचा खून करण्यात आला. महात्मा फुले वसाहतीजवळ लक्ष्मी मंदीरासमोर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स (वय २८, रा. मातंग वसाहत, कागल) असे मयत तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले.


लॉकडाऊनमुळे कागल शहरातील रस्ते शांत व निमर्नुष्य आहेत. शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यावर किरकोळ रहदारी आहे. अशा परिस्थितीत येथील महात्मा फुले वसाहतीजवळील लक्ष्मी मंदीर समोरून आपल्या घराकडे आकाश जात होता. यावेळी तेथे थांबलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याला थांबून डोळ्यावर मिरचीपूड फेकल्याचे समजते. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप १६ वार करण्यात आले. या हल्ल्यात आकाश रक्तबंबाळ होऊन जोरात किंचाळत जागेवर कोसळला. तो जाग्यावर निचपित पडल्यावर दोन हल्लेखोर मोटरसायकलवरून सांगाव नाक्याच्या दिशेने पसार झाले. जमलेल्या तरुणांनी आकाशला उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला. 


 घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच फ्लॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या शस्त्राची पाहणी केली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 
आकाश हा ठेकेदार म्हणून छोटी मोठी गटारीची कामे करीत होता. 

संपादन - धनाजी सुर्वे   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com