पन्हाळा : तालुक्यातील एका गावात एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणाकडून होणाऱ्या त्रासास कंटाळून तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची फिर्याद पीडित तरुणीच्या नातेवाइकांनी दिली. याप्रकरणी संशयित आदित्य दिलीप पाटील (वय २१, रा. वाघवे, ता. पन्हाळा) याला पन्हाळा पोलिसांनी अटक करून न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.