
कोल्हापूर : फुटबॉल खेळताना धाप लागून अत्यवस्थ बनलेल्या महेश धर्मराज कांबळे (वय ३०, रा. निर्माण चौक, संभाजीनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कळंबा परिसरातील टर्फमध्ये हा प्रकार घडला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.