ट्रकच्या व्यवहारात फसवणुकीमुळे तरुणांने संपवले जीवन

 Youngsters end their lives due to fraud in truck dealings
Youngsters end their lives due to fraud in truck dealings

नागाव, कोल्हापूर : कोल्हापुरातील दोघा जणांनी साडेतीन लाखांची आर्थिक फसवणूक केल्याने ट्रक व्यवसायात करिअरची संधी शोधणाऱ्या युवकाने गळफास घेऊन स्वतःचीच जीवनयात्रा संपवली. ओंकार भगवान इंदुलकर (वय 25 , मालेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली, मूळगाव वारणा कोडोली, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. 
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यात झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली आहे, त्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहून ठेवले आहे. 
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : ओंकार याचे मूळगाव कोडोली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई, दोन बहिणींसह तो मामाकडे मालेवाडी येथे राहत होता. ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या ओंकारने ट्रक व्यवसाय करायचे ठरवले. 
एक एक पै गोळा करून त्याने स्वतःचा 12 चाकी ट्रक खरेदी केला. त्यासाठी काही रक्कम कर्ज व हात उसने घेतली होती. दरम्यान, लॉकडाउनमुळे तो आर्थिक अडचणीत आला. देणेकरी त्याच्या मागे लागल्याने त्याने ट्रक विकला. या व्यवहारात त्याची फसवणूक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांनी त्याला साडेतीन लाखांचा गंडा घातला. त्याने पुन्हा ट्रक चालक म्हणून काम सुरू केले. मात्र फसवणुकीमुळे त्याचे संतुलन बिघडले होते. तो काल शिरोली एमआयडीसीत आला व गाडीला लोड नसल्यामुळे एमआयडीसी भागातच ट्रक थांबवून राहिला होता. आज सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अतुल लोखंडे तपास करीत आहेत. 

चिठ्ठीत फसवणुकीची माहिती 
पाटील व शिंदे या दोघांनी मिळून आपली फसवणूक केली आहे. देणेकरी त्रास देऊ लागले आहेत. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहे. फसवणूक केलेल्यांचे मोबाईल क्रमांक आणि त्यासंबंधीचे पुरावे कोठे आहेत, याचाही चिठ्ठीत उल्लेख आहे. काही पुरावे आपल्या स्मार्टफोनमध्ये असून ते कोणत्या फाईलमध्ये आहेत व त्याचा लॉक डीकोड काय हेही त्याने चिठ्ठीत नमूद केल्या आहेत. 

- सपादन - यशवंत केसकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com