रांजणी : शिवीगाळ केल्याच्या किरकोळ करणातून येथील तरुणास सात जणांनी बेदम मारहाण झाली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. सचिन शिवाजी वाघमोडे (रांजणी-लिंबेवाडी) असे तरुणाचे नाव आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात (Kavathe Mahankal Police Station) याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून चौघांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.