डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला. अपघात होताच आसपासच्या ग्रामस्थांसह वाहनधारकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
बाजार भोगाव : पुणे-बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway Accident) पाचवड फाटा (नारायणवाडी) परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात येथील तरुण ठार झाला. अविनाश आनंदा लोंढे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. दुचाकी दुभाजकाला धडकून अपघाताची शक्यता पोलिसांनी (Police) वर्तवली आहे.