
वारणानगर : वारणा नदीत रविवारी पोहोण्यासाठी गेलेल्या आदित्य दीपक दाभोळकर (वय २२, रा. वारणानगर, ता. पन्हाळा) या युवकाचा मृतदेह निलेवाडीच्या हद्दीत आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सापडला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने शोधमोहीम राबविली.