

Election Commission to announce ZP elections
esakal
Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणूक सोमवारी (ता. ५) किंवा मंगळवारी (ता. ६) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय कामांना गती आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरूनही तशा सूचना दिल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.