Kolhapur ZP CEO Dr. Jasmine
sakal
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयात स्वच्छता राखावी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेचे पालन करावे, कामकाजातील पारदर्शकता यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देत कामाच्या ठिकाणी उपस्थित नसणाऱ्या आरोग्य विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले. नूतन कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.