कोल्हापूर : महापालिकेची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार

निवडणूक कार्यालय, महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच चारही विभागीय कार्यालयांत उद्या
kolhapur municipal corporation
kolhapur municipal corporationsakal
Updated on: 

कोल्हापूर : विधानसभेच्या मतदार यादीआधारे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करून महापालिकेने प्रारूप मतदार यादी तयार केली. ही यादी मुख्य इमारत, निवडणूक कार्यालय, महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच चारही विभागीय कार्यालयांत उद्या (ता. २३) प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदारसंख्येत आठ हजार ६८२ इतकी वाढ झाली आहे.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ३१ मे २०२२ पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६ इतकी आहे. २०१५ च्या निवडणुकीत मतदार संख्या चार लाख ५३ हजार २१० इतकी होती. यंदा ती चार लाख ६१ हजार ८९२ इतकी आहे. त्यात पुरुष मतदार दोन लाख ३२ हजार ५७, तर स्त्री मतदार दोन लाख २९ हजार ८१७ व इतर १८ मतदार आहेत.

या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी उद्यापासून १ जुलैपर्यंत आहे. हरकती व सूचनांसाठी विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंत्यांची सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने हरकती व सूचनांवर लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे अशी दुरुस्ती करता येईल, असे सांगितले आहे. ज्या हरकती असतील, त्याबाबत बीएलओ संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी करून नंतर निर्णय घेतील. तसेच, एका मतदाराचे नाव एका प्रभागाबरोबरच इतर प्रभागात असेल तर त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचे आहे, हे विचारून त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. ती नावे वगळण्याचे किंवा वाढविण्याचे अधिकार नाहीत, असेही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ९ जुलैला प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत कोणतीही हरकत-सूचना असेल तर संबंधित विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता तथा सहायक प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत लेखी स्वरूपात दाखल करावी, असे आवाहनही केले आहे.

दृष्टिक्षेपात

एकूण मतदार- ४ लाख ६१ हजार ८९२

पुरुष- दोन लाख ३२ हजार ५७

महिला- दोन लाख २९ हजार ८१७

इतर- १८

याची होणार दुरुस्ती

लेखनिकांच्या काही चुका

दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून समावेश

विधानसभा मतदार यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नावे नसल्यास

हे नाही होणार दुरुस्त

नवीन नावांचा समावेश व वगळणे

पत्ते, नावात दुरुस्ती

स्थलांतरित झाले असल्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com