VIDEO : तुर्की आणि ‘युके’तील पर्यटकांनी अनुभवली कोल्हापुरी संस्कृती

Kolhapuri culture is experienced by tourists from Turkey and the UK kolhapur marathi news
Kolhapuri culture is experienced by tourists from Turkey and the UK kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर - महाराष्ट्र पर्यटन विकासाचा भाग म्हणून सुरू झालेल्या डेक्कन ओडीसी या आलिशान रेल्वेतून आज साठ परदेशी पर्यटकांनी कोल्हापूरचे आदरातिथ्य अनुभवले. अस्सल कोल्हापुरी संस्कृती, कोल्हापूरचा बावीसशे वर्षांपूर्वीचा इतिहास, कोल्हापूर संस्थानची परंपरा या साऱ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. तुर्की आणि ‘युके’तील पर्यटकांचा आजच्या फेरीमध्ये समावेश होता. 

डेक्कन ओडिसीतून साठ परदेशी पर्यटकांची सफर

‘पॅलेस ऑन व्हील’च्या धर्तीवर देशातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यासाठी डेक्कन ओडीसी रेल्वे चालविली जाते. आरामदायी आसन व्यवस्थेपासून पर्यटकांनी अनुभवली कोल्हापुरी संस्कृती विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण सुविधा असलेल्या या रेल्वेचा प्रवास सुरू झाला. आज सकाळी रेल्वे कोल्हापुरात आली. त्यानंतर खासगी बसमधून पर्यटकांना अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, नवीन राजवाडा, टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तू संग्रहालय, दूध कट्टा, कोल्हापुरी चप्पल आदींची माहिती देण्यात आली. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही पर्यटकांना दाखवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Almatti Dam Flood Impact
Sangli Electrocution Accident Kupwad MIDC
Sangli Market Yard jaggery adulteration news
Marathi News Esakal
www.esakal.com