कोंडाबाई बनल्या विसापूरच्या "लकी सरपंच' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

विसापूर (सांगली) : नाट्यपूर्ण घडामोडीत येथे सरपंचपदी भाजपच्या सौ. कोंडाबाई शामराव माने यांची निवड झाली. समान मते पडल्यानंतर चिठ्ठीद्‌वारे सौ. माने यांची निवड झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. सुनील पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. 

विसापूर (सांगली) : नाट्यपूर्ण घडामोडीत येथे सरपंचपदी भाजपच्या सौ. कोंडाबाई शामराव माने यांची निवड झाली. समान मते पडल्यानंतर चिठ्ठीद्‌वारे सौ. माने यांची निवड झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. सुनील पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. 

अविश्वास ठरावानंतर सरपंचाची निवड लॉकडाऊनमुळे लांबली होती. ग्रामपंचायतीत निवडप्रक्रिया राबवण्यात आली. भाजपकडून सौ. कोंडाबाई माने यांचा अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीमध्ये एकमत न झाल्याने सौ. मीना माने व सौ. जयश्री माने यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज कोणाचा ठेवायचा या वादाच्या पार्श्वभूमीवर अर्ज कोणीही दाखल करू नये, असे गटनेत्यांनी बजावले. मात्र या दोन्ही उमेदवारांनी कानाडोळा करीत निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला. 

भाजपशी सलगी असणाऱ्या दोन सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत न करता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एकीकडे तिघे, तर दुसऱ्या उमेदवाराबरोबर सहा अशी मतविभागणी झाली. राष्ट्रवादीतील दुफळी भाजपच्या पथ्यावर पडली. 

दोन्ही उमेदवाराला समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याचे ठरले. यातून सौ. माने यांच्या नावाची चिठ्ठी लहान मुलांनी उचलली. यातून सौ.माने विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी केली. 

सौ.माने यांचा प्रशासन, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी सत्कार केला. उपसरपंच कोंडीबा माने, माजी उपसरपंच इंद्रजीत चव्हाण, सुनंदा माने, मालन माने, लक्ष्मी सुतार, सतिश माने, दीपक अमृतसागर, विठ्ठल मोरे, विलास माळी उपस्थित होते. मंडल अधिकारी संजय पाटील निवडणूक निर्णय अधिकारी होते. ग्रामविकास अधिकारी प्रविण खरमाटे, तलाठी श्री. शिंदे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kondabai becomes 'Lucky Sarpanch' of Visapur