उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; शिवसेनेचा 'हा' आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajan Salvi

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; शिवसेनेचा 'हा' आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

Rajan Salvi News : शिवसेनेला (Shiv Sena) धक्क्यावर धक्के बसतच आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. या आमदारांच्या पाठिंब्यावरच एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि बहुमताची चाचणी जिंकली सुद्धा. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता विविध शहरांच्या महापालिकेतील नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत.

त्यातच आता शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असून तो कोकणातून असण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे कोकणातील (Konkan) राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार साळवींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन ठाकरे यांची डोकेदुःखी वाढवलीय. आमदार राजन साळवी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे, याच राजन साळवींना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही साळवींनी फडणवीस यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: भाजपच्या संसदीय मंडळातून गडकरींना हटवलं; स्वामी म्हणाले, आता मोदींच्या इच्छेनं..

मात्र, शिंदे गटाच्या प्रवेशावर साळवींनी ट्विटव्दारे प्रत्युत्तर दिलंय. साळवींनी ट्विटमध्ये लिहिलंय, आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी.. काल, आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेत असलेला फोटो शेअर केलाय. त्यामुळं ते उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांनी आदित्य ठाकरेंना देखील टॅग केलंय.

Web Title: Konkan Mla Rajan Salvi Is Likely To Leave Uddhav Thackeray Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..